विशेषांकाद्वारे सनातन संस्थेची महती सांगायला मिळाल्याविषयी कृतज्ञता !
सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि इंदूर (मध्यप्रदेश) येथील त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी वंदन ! प.पू. भक्तराज महाराज हे सनातन संस्थेचे श्रद्धास्थान आहेत. सनातन संस्था यंदा स्थापनेची २५ वर्षे पूर्ण करत आहे. सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी (२५ व्या) वर्धापनदिनानिमित्त ‘सनातन संस्थेच्या व्यापक कार्याची केवळ तोंडओळख’ म्हणावी, अशी माहिती या ‘सनातन संस्थेचा रौप्यमहोत्सव’ विशेषांकात दिली आहे. ‘या विशेषांकाच्या माध्यमातून सनातन संस्था आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती जिज्ञासू, वाचक, साधक आणि हितचिंतक यांची भावभक्ती वाढू दे आणि त्यांना शीघ्र आध्यात्मिक उन्नती करण्याची प्रेरणा मिळू दे’, अशी भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना, तसेच सनातन संस्थेच्या दिव्य, अलौकिक कार्याविषयीची माहिती जिज्ञासू वाचकांपर्यंत पोचवण्याची संधी आम्हाला प्राप्त झाल्याविषयी कृतज्ञता !