मकोका लावलेल्या आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील १० जणांची पुराव्यांअभावी मुक्तता !
डोंबिवली येथील मंगळसूत्राच्या चोरीचे प्रकरण
कल्याण – डोंबिवलीतील एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्राच्या चोरीचे प्रकरणात रामनगर पोलिसांनी आंबिवलीच्या इराणी वस्तीमधील १० जणांना अटक केली होती. त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी कायद्याने (मकोका) १० वर्षांपूर्वी कारवाई करण्यात आली होती. रामनगर पोलिसांनी चोरी प्रकरणातील तपासात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. त्यामुळे आरोपींविरुद्ध सबळ पुरावे उपलब्ध नसतांना त्यांना नियमबाह्य पद्धतीने या प्रकरणात गोवल्याचे न्यायालयाने सांगितले. त्यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केल्याचा ठपका ठेवत ठाणे येथील मोक्का न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेट्ये यांनी मंगळसूत्र चोरीचा आरोप असलेल्या इराणी टोळीतील दहा आरोपींची मोक्का आरोपातून मुक्तता केली.
मुक्तता झालेल्यांमध्ये शेरबी युसुफ सय्यद (वय ७७ वर्षे), फिजा रहिम शेख (वय ४२ वर्षे), वासिम फिरोज इराणी (वय ३७ वर्षे), शकील सय्यद (वय ४२ वर्षे), मेहंदी सय्यद (वय ४० वर्षे), साधू इराणी (वय ३३ वर्षे), यावर सलीम हुसेन (वय ३७ वर्षे), यावर काझम हुसेन (वय ३७ वर्षे), तरबेज जाकर इराणी (वय ४० वर्षे), अख्तर इराणी (वय ३७ वर्षे), नासिक हाफिज खान (वय ४५ वर्षे) यांचा समावेश आहे.
डोंबिवलीतील फडके रस्त्यावरील श्री गणेश मंदिर येथून फेब्रुवारी २०१५ मध्ये दीपा टिकेकर ही महिला संध्याकाळच्या वेळेत पायी चालल्या होत्या. त्या वेळी मोटार सायकलवरून आलेल्या दोन जणांनी दीपा यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दीपा यांनी तक्रार केली होती.
संपादकीय भूमिका
|