सनातनचे हे छोटे रोपटे वटवृक्षात रूपांतरित झाले ।
‘सनातन संस्थेचे रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे’, हे कळल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी सुचवलेले कृतज्ञतारूपी काव्य श्री गुरुचरणी समर्पित करीत आहे.
श्रीविष्णूचे नवचैतन्य कार्यरत झाले ।
सारी अवनी हर्षाेल्हासित झाली ।। १ ।।
सनातन संस्थेची स्थापना झाली ।
धर्मरक्षकांची मांदियाळी निर्माण झाली ।। २ ।।
सनातन संस्थेचा सर्वत्र जयजयकार झाला ।
ईश्वरी भगव्या वादळाचा जणू उदय झाला ।। ३ ।।
रज-तम लय होण्याचा काळ समीप आला ।
चराचरांतील सत्त्वगुण वृद्धींगत झाला ।। ४ ।।
मानवी जीवनाला अध्यात्माचा आधार लाभला ।
सनातनचा मोक्षदायी (टीप) मार्ग समस्त जिवांना कळला ।। ५ ।।
सनातनचा रौप्य महोत्सव समीप हा आला ।
सनातनचा हा काळ श्रीविष्णूने अवतरण केला ।। ६ ।।
हिंदु राष्ट्र स्थापनेची घटिका जवळ आली ।
सनातनच्या कार्याची जणू पोचपावतीच मिळाली ।। ७ ।।
सनातनचे हे छोटे रोपटे वटवृक्षात रूपांतरीत झाले ।
या वटवृक्षाच्या छायेत असंख्य साधक-संत उजळले ।। ८ ।।
धन्य ते स्थापनाकर्ते नारायणरूपी सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव ।
कृतज्ञतेने तुमच्या चरणी नतमस्तक सारे साधक जीव गुरुदेव’ ।। ९ ।।
(टीप : मोक्षाची वाट दाखवणारी)
श्रीकृष्णार्पणमस्तु,
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |