‘साधनेसाठी तन, मन आणि धन अर्पण करा’, असे शिकवणारी एकमेव सनातन संस्था !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘आध्यात्मिक उन्नतीसाठी साधना करतांना ‘त्याग’ हा महत्त्वाचा टप्पा असतो. यामध्ये तन, मन आणि धन गुरूंना अथवा ईश्वराला अर्पण करणे आवश्यक असते. अनेक संप्रदाय त्यांच्या भक्तांना नाम, सत्संग यांसारखा तात्त्विक भाग शिकवतात; परंतु त्यागाविषयी कुणी शिकवत नाहीत. केवळ ‘सनातन संस्थे’मध्ये प्रारंभीच्या सत्संगापासूनच त्यागाचे बीज रोवले जाते. याच कारणास्तव अन्य संप्रदायांच्या तुलनेत सनातनच्या साधकांची जलद गतीने आध्यात्मिक उन्नती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, संस्थापक, सनातन संस्था