Karnataka Constable Attacked : परीक्षेत कॉपी करायला सहकार्य न करणार्या पोलिसाला मारहाण : दोघांना अटक
अफजलपूर (कर्नाटक) – द्वितीय ‘प्री युनिव्हर्सिटी कोर्स’च्या (‘पीयूसी’च्या) परीक्षेत कॉपी करण्यासाठी सहकार्य केले नाही; म्हणून कर्तव्यरत असलेल्या पोलीस हवालदारावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली. कलबुर्गी तालुक्यातील करजगी परीक्षा केंद्राजवळ ही घटना घडली.
परीक्षा केंद्राजवळ पोलीस हवालदार पंडित पांड्रे कर्तव्य बजावत असतांना कैलास सक्करगी पांड्रे यांच्याकडे येऊन ‘माझी धाकटी बहीण परीक्षेला बसली आहे. यासाठी मला वर्गात जाऊ द्या, नाहीतर तुझ्याशी काहीतरी वेगळेच करावे लागेल बघ’, अशी धमकी दिली. कैलास याने परीक्षा केंद्रात घुसण्याचा प्रयत्न केल्याने त्याला हवालदार पांड्रे यांनी अडवले. त्या वेळी कैलास सक्करगी आणि त्याचा साथीदार समीर नडूविनकेरी यांनी पांड्रे यांच्याकडे असलेली लाठी हिसकावून घेऊन त्यांच्यावर आक्रमण केले.
संपादकीय भूमिकाकॉपीसाठी थेट पोलिसांवर आक्रमण करण्याचे धाडस होते, यावरून देशात कशी स्थिती निर्माण झाली आहे ?, हे लक्षात येते ! जनतेवर योग्य संस्कार न करणारे आणि योग्य शिक्षण न देणारे सर्वपक्षीय शासनकर्तेच या स्थितीस उत्तरदायी आहेत ! |