Goa Funds Electoral Bonds : निवडणूक रोख्यांद्वारे गोव्यात भाजपला २७ कोटी, तर काँग्रेसला १ कोटी ८० लाख रुपये मिळाले !
पणजी, २२ मार्च (वार्ता.) : गोव्यातील भाजपला निवडणूक रोख्यांच्याद्वारे माध्यमातून २७ कोटी रुपये, तर काँग्रेसला १ कोटी ८० लाख रुपये देणगी मिळाली आहे. १२ एप्रिल २०१९ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत विकण्यात आलेल्या निवडणूक रोख्यांच्या आधारावरून ही माहिती उपलब्ध झाली आहे.
गोव्यातील साळगावकर, धेंपे, तिंबले आणि चौगुले या उद्योगसमुहांनी निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून भाजपला २३ कोटी १ लाख रुपये देणगी दिली आहे. यामध्ये खाण क्षेत्रातील अग्रणी उद्योजक तिंबलो यांनी ‘फोमेंतो’ उद्योग समुहाच्या नावाने सर्वाधिक म्हणजे १३ कोटी रुपये दिले आहेत. यातील सर्वाधिक देणग्या जानेवारी २०२२ म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या एक मासाच्या पूर्वी देण्यात आलेल्या आहेत. गोव्यात नव्याने निवडणुकीत उतरलेल्या तृणमूल काँग्रेसला निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून ६० लक्ष रुपये मिळाले. आम आदमी पक्षाला ३८ लाख रुपये, गोवा फॉरवर्डला ३५ लाख रुपये आणि मगोपला ५५ लाख रुपये निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मिळाले आहेत.