डोंबिवली येथील पाळणाघरात लहान मुलांच्या छळाविरोधात गुन्हा नोंद
डोंबिवली (जिल्हा ठाणे) – येथील ‘हॅप्पी किड्स डे केअर सेंटर’ चालवणार्यांसह कर्मचार्यांकडून मुलांना होणारी मारहाण आणि संतापजनक वागणुकीचा व्हिडिओ समोर आला आहे.
शिवसेना ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी कविता गावंड यांच्या साहाय्याने डोंबिवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. या प्रकरणी आधी पोलिसांनी ‘चाईल्ड वेल्फेअर’मध्ये जा’ असे सांगून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली; मात्र नंतर एसीपी सुनील कुर्हाडे यांनी तक्रार घेण्यास सांगितल्यावर पाळणाघर चालवणार्या गणेश प्रभुणे आणि आरती प्रभुणे या दांपत्यासह राधा नाखरे या महिलेविरोधात गुन्हा नोंद केला आहे.
प्रभुणे दांपत्य आणि नाखरे यांनी लहान मुलांना बांधून ठेवले होते. त्यांना मारहाण केली जात होती. लहान मुलांना मानसिक आणि शारीरिक त्रासही दिला जात होता. सामंत यांनी या सर्व प्रकारचा व्हिडिओ काढला हा व्हिडिओ शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकारी कविता गावंड यांना दिला. हे दांपत्य साडेआठ सहस्र रुपये उगले यांच्याकडून घेते.