सार्वजनिक शौचालयाच्या गटारात पडून २ जणांचा मृत्यू, १ गंभीर घायाळ !
मुंबई – मालाड मालवणी येथे एका सार्वजनिक शौचालयाच्या गटारात ३ तरुण पडल्याची घटना २१ मार्च या दिवशी संध्याकाळी घडली. मालवणी गेट क्रमांक ८ येथे घडलेल्या या घटनेतील दोघांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. एकाची प्रकृती गंभीर आहे.
शौचालयाच्या १५ फूट खोल मल:निस्सारण वाहिनीत तीन तरुण पडले. या शौचालयाची देखभाल एका खासगी कंत्राटदाराद्वारे करण्यात येत आहे. मात्र त्याचे दुर्लक्ष झाल्याचे सांगितले जात आहे.