मुलाने बलात्कार केल्याचे सांगून वडिलांकडून तोतया पोलिसाने पैसे उकळले !
मुंबई – शीव कोळीवाडा येथील केंद्रीय शाळेतील एका शिक्षकाकडून मुलाला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्याची धमकी देत सुमारे दीड लाख रुपये उकळण्यात आले. या प्रकरणी कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
उत्तरप्रदेशमध्ये मोठ्या महाविद्यालयात शिक्षण घेणार्या त्यांच्या मुलाने तरुणीवर बलात्कार केल्याचा भ्रमणभाष सीबीआयचा अधिकारी असल्याचे सांगणार्या व्यक्तीने केला आणि आरोपी न करण्यासाठी पैशांची मागणी केली. पैशांची मागणी संपत नसल्याने त्यांच्या पत्नीने त्यांच्या मुलाला व्हिडिओ कॉल करून त्याविषयी विचारले असता तो अभ्यास करत असल्याचे दिसले. असे काहीच झाले नसल्याचे त्याने सांगितले.
संपादकीय भूमिकाकायद्याचा धाक संपल्याचे लक्षण ! |