मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहिमेच्या अंतर्गत १३ नाल्यांची स्वच्छता !
कोल्हापूर – महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने मान्सूनपूर्व नाले स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या अंतर्गत १३ मुख्य आणि ४७६ छोटे नाले यांची स्वच्छता करण्यात आली आहे. याद्वारे ५० डंपर गाळ काढण्यात आला आहे. आता कदमवाडी रस्ता, विक्रमनगर, धान्यसाठा केंद्र या परिसरात नाले स्वच्छतेचे काम आता चालू करण्यात येणार असून हे काम १५ मेपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे.