केजरीवालांची अटक पूर्णपणे चुकीची ! – शरद पवार

अरविंद केजरीवाल आणि शरद पवार

बारामती – सरकार अलीकडे ईडी, सीबीआय, आयकर सारख्या एजन्सींचा अपवापर मोठ्या प्रमाणात विरोधी आवाज दाबण्यासाठी करत आहे. अरविंद केजरीवाल यांच्यावर काहीतरी कारवाई होईल, अशी शंका आधीपासूनच होती; पण ३ वेळा मुख्यमंत्री झालेल्या केजरीवालांना राज्याचे समर्थन आहे. राज्याच्या प्रमुखाला अटक करणे आणि त्याने धोरणे ठरवली म्हणून त्यासाठी अटक करणे हे पूर्णपणे गैरवाजवी आहे, चुकीचे आहे. त्यांच्यावर झालेल्या कारवाईचा १०० टक्के परिणाम राज्यातील जनतेवर होणार आहे, असे वक्तव्य बारामती दौर्‍यात शरद पवारांनी पत्रकार परिषद घेऊन केले.

अधिकोषातील खाती बंद केल्याने काँग्रेस पक्षाचे त्यांच्या निवडणूक प्रचाराचे नियोजन कोलमडले आहे. देशातील महत्त्वाच्या पक्षाला प्रचार करण्यासाठी साधनसामग्रीही उपलब्ध करून द्यायची नाही अशी टोकाची भूमिका यापूर्वी कधी झाली नव्हती. राज्याच्या प्रमुख नेत्यांविरोधात एजन्सींचा वापर करण्यात येत आहे. झारखंडच्या मुख्यमंत्र्यांची चौकशी लावून त्यांना कारागृहात टाकले आहे.