(म्हणे) ‘पुरणपोळी होळीत न टाकता ती गरिबांना दान करा !’
अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेचे आवाहन !
पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) – नागरिकांनी पर्यावरणपूरक होळी साजरी करावी आणि पुरणपोळी होळीत न टाकता तिचे दान गरिबांना करावे, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून देहूरोड, बिजलीनगर, चिंचवड या भागांत होळीला नैवेद्य म्हणून वहाण्यात येणारी पुरणपोळी आणि नारळ यांचे संकलन करून देहूरोडमधीलच गरीब वस्तीत वाटपाचे काम ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात येते. शहरातील इतर भागांतील नागरिकांनी त्याचे अनुकरण करावे, असे आवाहनही अंनिसने पत्रकाद्वारे केले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु सणांच्याच दिवशी अशी शास्त्रविरोधी आवाहने का केली जातात ? |