मुजाहिदवर हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा अवमान केल्यावरून तक्रार प्रविष्ट !
ठाणे – मुजाहिद याने श्री स्वामी समर्थ यांच्या चेहर्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा बसवून ते चित्र प्रसारित केले आणि त्यावर ‘स्वामी सत्यनाशी महाराज’ असे लिहिले आहे. महाराष्ट्रात मोठ्या संख्येने भक्तगण असलेल्या श्री स्वामी समर्थ यांच्याविषयीच्या अवमानजनक चित्रामुळे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. यामुळे पंतप्रधान मोदी यांचाही अवमान झाला आहे.
वसई-विरार क्षेत्रातील नवघर पोलीस ठाण्यात भाजपच्या आमदार गीता जैन यांनी मुजाहिद याच्यावर प्रसिद्ध संत स्वामी समर्थ यांचे अयोग्य चित्र प्रसारित केल्याविषयी तक्रार प्रविष्ट केली आहे. भादंवि कलम ‘१५३ ए’ आणि ‘२९५ ए’ या अंतर्गत ही तक्रार प्रविष्ट झाली असून त्याच्यावर ‘आयटी कायदा २०००’ आणि ‘कलम ६६ ए’ही लावण्यात आले आहे. अद्याप पोलिसांनी त्याला अटक केलेली नाही.
मीरारोड परिसरात यापूर्वीही मुजाहिद याने अन्य अयोग्य कृत्ये केल्याचे पुढे आले आहे. त्याने संबंधित अवमानजनक पोस्ट हटवल्याचे समजते. काही दिवसांपूर्वी मीरारोड येथे मुसलमानांनी हिंदूंच्या गाड्यांवर आक्रमण करणे, भगवे ध्वज फाडणे आदी कृत्ये करून दंगल केली होती.
संपादकीय भूमिका
|