भारताची अतिशय केविलवाणी स्थिती !
अमेरिकनिझमने आम्हाला सर्व विषयांमध्ये पुरा उल्लू (मूर्ख) बनवले आहे. खाद्यपेये, वस्त्रे, आभूषणे, चालीरिती, भाषा, दृष्टी, वैचारिक पोषण, आर्थिक आणि राजकीय व्यवहार अशा सर्वच क्षेत्रांत अमेरिकनिझमने, म्हणजे भोगवादाच्या अजगराने भारताला कवटाळले आहे. प्रा. एरिक फ्रोम लिहितो, ‘आमचे मेंदू सडले, तर नाहीत ना ?’ पुढे ते म्हणाले, ‘एकेकाळी अमेरिका जिंकणारा, प्रखर देशाभिमानी आणि ज्वलंज्जहाल संन्यासी स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेला खडसावले होते, ‘Your Knowledge is skin-deep. scratch a little and the original beast, springs out.’ (अर्थ : तुमचे ज्ञान तुमची संस्कृती ही दिखाऊ आहे. वरवरची आहे. थोडे घासले की, मूळचा तो पशू वर उसळून येतो.)
आम्ही आहार, निद्रा, मैथुनाकरता जगणार आहोत का ? आम्ही कधी जागणार ? आमच्याकरता आता वेड्यांच्या रुग्णालयातच जागा उरली आहे. हा खंडित भारत अमेरिकनिझमने वेड्यांचे निवासस्थान बनवला आहे. खंडित भारतात आता केवळ वेड्यांचाच जोरदार बाजार भरतो.’
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, एप्रिल २०२१)