जळण्याच्या घटनांमध्ये आता मुले आणि पुरुष यांचे प्रमाण अधिक !
मुंबई – घरगुती हिंसाचार किंवा जळण्याच्या घटनांमध्ये आता महिलांएवेजी मुले आणि पुरुष यांचे प्रमाण अधिक असल्याचे निरीक्षण ‘नॅशनल बर्न्स सेंटर’च्या वैद्यकीय तज्ञांनी नोंदवले आहे.
अंगावर तेल सांडणे, गरम पाणी ओतून घेणे, घाईगडबडीमध्ये अंगावर गरम अन्न पडणे, विद्युतवाहक उपकरणांमध्ये हात घातल्याने विजेचा धक्का बसणे आदी दुर्घटना मुलांमध्ये वाढल्या आहेत.
जळीत रुग्णांसाठी विनाशुल्क शस्त्रक्रिया शिबिरांचे आयोजनही ‘नॅशनल बर्न्स सेंटर’कडून रोटरी क्लबच्या साहाय्याने केले जाते.