३ दिवस अधिकोषांना सुट्टी !
मुंबई – येत्या आठवड्यात किमान ३ दिवस बँका बंद असणार आहेत. २३ ला चौथा शनिवार, २४ ला रविवार आणि होळी, २५ ला धूलिवंदनाची सुट्टी असणार आहे.
३१ मार्च या दिवशी अधिकोष चालू रहातील !
रिझर्व्ह बँक आँफ इंडियाने ३१ मार्च या आर्थिक वर्षातील शेवटच्या दिवशी भारत सरकारने सरकारी पावत्या आणि देयकासंबंधित बँकांच्या सर्व शाखा व्यवहारासाठी खुल्या ठेवण्याचे आदेश दिले आहेत; जेणेकरून आर्थिक वर्ष २०२३-२०२४ च्या पावत्या आणि देयके यांचा कारभार सुरळीत पार पडेल.