५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला नाशिक येथील चि. दिव्यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! चि. दिव्यांश जोशी हा या पिढीतील एक आहे !
चि. दिव्यांश सुमित जोशी (वय अडीच वर्षे) याच्याविषयी त्याची आई आणि आजी (आईची आई) यांना दिव्यांशच्या जन्मापूर्वी अन् नंतर आलेल्या अनुभूती आणि जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ -सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. जन्मापूर्वी
१ अ. भक्तीसत्संगात एक छोटा मुलगा श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांना साष्टांग नमस्कार करतांना दिसून आनंद जाणवणे : ‘मी सौ. श्रद्धाला ३ र्या मासाची चोर ओटी भरण्यासाठी लासलगाव येथे बोलावले होते. त्या दिवशी गुरुवार होता. भक्तीसत्संग चालू असतांना मला निळे कपडे घातलेला अंगठ्याएवढा छोटा बालक श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना सारखा साष्टांग नमस्कार करतांना दिसत होता. हे दृश्य मला काही मिनिटे दिसले. तेव्हा मला आनंद जाणवत होता.
१ आ. सनातनचे ९८ वे (समष्टी) संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांनी सौ. श्रद्धा जोशी यांच्यासाठी प्रार्थना आणि नामजप केल्यामुळे कोरोना होऊनही ती त्यातून बरी झाल्याचे जाणवणे : त्याच सुमारास मी छत्रपती संभाजीनगर येथील सनातनचे ९८ वे (समष्टी) संत पू. (अधिवक्ता) सुरेश कुलकर्णी यांना काही निमित्ताने संपर्क केला होता. तेव्हा त्यांनी श्रद्धाची विचारपूस केली. मी त्यांना सांगितले, ‘‘ती गर्भवती आहे.’’ त्यानंतर तिला कोरोना झाला. पू. कुलकर्णीकाकांनी तिच्यासाठी प्रार्थना आणि नामजप केल्यामुळे ती आणि बाळ सुरक्षित राहिले, असे मला जाणवले. त्यासाठी आम्ही कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’
– सौ. निलिमा कुलकर्णी (चि. दिव्यांशची आजी (आईची आई)), लासलगाव (नाशिक)
१ इ. ‘चि. दिव्यांशच्या जन्मापूर्वी मला स्वप्नात प्रत्येक गुरुवारी आणि शुक्रवारी देवीचे मंदिर अन् पिवळसर पांढरा प्रकाश दिसायचा.
१ ई. मी श्रीरामरक्षास्तोत्र, गणपतिस्तोत्र, चंडीकवच ऐकतांना आणि म्हणतांना मला गर्भाची पुष्कळ हालचाल जाणवायची.’
– सौ. श्रद्धा सुमित जोशी (चि. दिव्यांशची आई), नाशिक.
२. प्रसुती
२ अ. श्रीरामाचा नामजप करतांना कृष्ण दिसणे आणि त्याच दिवशी रात्री सौ. श्रद्धाला बाळंतपणासाठी रुग्णालयात न्यावे लागणे : ‘एकदा संध्याकाळी मी डोळे मिटून श्रीरामाचा नामजप करत होते, तेव्हा ‘काही काळ माझे ध्यान लागले’, असे मला वाटले आणि ध्यानात मला बाळकृष्ण गोल फिरतांना दिसला. त्याच्याभोवती कृष्णाच्या नामजपाच्या पट्ट्या गोल फिरत होत्या. त्याच दिवशी पहाटे ३ वाजता बाळंतपणासाठी श्रद्धाला रुग्णालयात भरती करावे लागले. सद़्गुरु नंदकुमार जाधव यांनी श्रद्धाला नैसर्गिक प्रसुतीसाठी दिलेले नामजपादी उपाय चालू होते.
२ आ. पू. सुरेश कुलकर्णी यांनी ‘सौ. श्रद्धा दुपारी ४ वाजता बाळंतीण होईल’, असे सकाळी ११ वाजता सांगणे आणि तसेच घडणे : श्रद्धा बाळंतीण होण्यात अडचणी वाढल्यावर मी पू. कुलकर्णीकाकांना संपर्क केला. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘आधुनिक वैद्यांना अपेक्षित असे दुपारी ३.३० पर्यंत होईल. आता मला दुपारी ४ वाजता संपर्क करा.’’ त्यांनी असे मला सकाळी ११ वाजता सांगितले. त्यानुसार दुपारी ४ वाजता परम पूज्यांच्या कृपेने श्रद्धाची नैसर्गिक प्रसुती झाली.
२ इ. बाळाच्या ठिकाणी पांढरा प्रकाश दिसणे : थोड्या वेळाने आधुनिक वैद्यांनी मला आत बोलावले, तेव्हा बाळ त्यांच्या हातावर पालथा होता आणि मला तेथे एकदम पांढरा प्रकाश दिसला.’
– सौ. निलिमा कुलकर्णी
२ ई. प्रसुतीच्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे मुख आणि पिवळा प्रकाश दिसणे : ‘प्रसुतीच्या वेळी १३ घंटे मला पुष्कळ त्रास झाला. प्रसुतीच्या वेळी मी प.पू. गुरुदेवांचा धावा करत असतांना अकस्मात् मला त्यांचे मुख आणि मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचा प्रकाश दिसला अन् त्याच क्षणी बाळाचा जन्म झाला.
३. जन्म ते ३ मास
३ अ. जन्मापासूनच बाळाच्या हाताच्या वेगवेगळ्या मुद्रा असतात.
३ आ. त्याच्या शरिरावर दैवी कण दिसतात.’
– सौ. श्रद्धा सुमित जोशी
३ ई. ‘चि. दिव्यांश १५ दिवसांचा असतांना दुपारी भक्तीसत्संगात बासरीची धून लागल्यावर तो कृष्णाच्या चित्राकडे एकटक बघायला लागला.
३ उ. ‘लक्ष्मीनारायण’ मंदिरात दिव्यांशच्या डोक्यावर नारायणाचा टोप ठेवल्यावर त्याच्या डोक्यावर झेंडूचे फूल पडणे : तो दीड मासाचा असतांना आम्ही त्याला ‘लक्ष्मीनारायण’ मंदिरात नेले होते. तिथे आशीर्वाद म्हणून येणार्यांच्या डोक्यावर नारायणाचा टोप ठेवतात. तसा दिव्यांशच्या डोक्यावर नारायणाचा टोप ठेवला असतांना त्याच्या डोक्यावर झेंडूचे फूल पडले. तेव्हा मंदिरातील पुजारी म्हणाले, ‘‘हे फूल कुठून आले ? ते मलाही कळले नाही. मी सकाळपासून बर्याच लोकांच्या डोक्यावर हा टोप ठेवला आहे.’’
– सौ. निलिमा कुलकर्णी
४. वय ४ मास ते ८ मास
अ. ‘तो ७ – ८ मासांचा असल्यापासून कृष्णाचे चित्र ओळखतो.’ – सौ. श्रद्धा सुमित जोशी आणि सौ. निलिमा कुलकर्णी
५. वय ९ मास ते १ वर्ष
अ. ‘मी दिव्यांशला औषध देतांना धन्वंतरी देवतेचा नामजप आणि श्लोक म्हणते. एखाद्या वेळी मी श्लोक म्हणायला विसरले, तर तो ‘धं ऽऽ धं ऽऽ’, असे म्हणून मला श्लोक म्हणायची आठवण करून देत असे. श्लोक म्हटल्याविना तो औषध घेत नसे.
आ. बाहेर फिरायला गेल्यावर त्याला कुठे मंदिराचा कळस दिसल्यावर ‘बाप्पा जय’, असे म्हणून हात जोडून नमस्कार करत असे.
इ. त्याला कुठलेही छायाचित्र दाखवले, तरीही तो गायीचे चित्र बघण्यासाठी हट्ट करत असे.
ई. तो स्वतःच्या वस्तू जागेवर ठेवतो.’
– सौ. श्रद्धा सुमित जोशी
उ. ‘तो प.पू. गुरुदेवांना ‘आबाबाप्पा’ म्हणतो. भ्रमणभाष आल्यावर तो ‘आबाबाप्पा’ दाखव म्हणतो. तो प.पू. गुरुदेवांचे छायाचित्र दिसल्यावर ते देवघरात नेऊन ठेवतो.
ऊ. त्याला दशमहाविद्या यंत्र आणि तिन्ही गुरूंचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे) छायाचित्र दाखवल्यावर तो त्यांना नमस्कार करतो.’
– सौ. निलिमा कुलकर्णी
६. वय दीड वर्ष ते अडीच वर्षे
अ. ‘त्याला सात्त्विक वस्तू, गाणी आवडतात. एकदा त्याला खेळण्याच्या दुकानात नेले होते. त्याला अनेक खेळणी दाखवली; पण त्याने गायच घेतली.
आ. सकाळी अंघोळ झाल्यावर तो गणपतीचा श्लोक, कुलदेवता, श्रीकृष्ण आणि दत्त यांचा नामजप करतो.
इ. तो सूर्याची नावे उच्चारत सूर्याला अर्घ्य देतो.
ई. तो प्रतिदिन त्याच्या वडिलांच्या समवेत देवपूजा करायला बसतो. तो पूजेसाठी देवघरातील देव ताम्हणात काढतो आणि महादेवाला अभिषेक करतांना ‘ॐ नमः शिवाय’, असा नामजप करतो. पूजा झाल्यावर नमस्कार करून देव जागेवर ठेवण्यासाठी त्याच्या बाबांकडे देतो.
उ. सायंकाळी देवाजवळ दिवा लावून देवांना उदबत्ती ओवळल्यावर तो शुभंकरोति आणि अन्नपूर्णा मातेचा श्लोक म्हणतो. नंतर देवाला साष्टांग नमस्कार करून आई-बाबांना नमस्कार करतो.
त्याची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. कुठलीही कृती एकदा पाहिल्यावर तशी करण्याचा तो प्रयत्न करतो.
ऊ. तो त्याच्या लहान मावस भावाला चि. कैवल्य प्रथमेश केंगे (अहिल्यानगर, आध्यात्मिक पातळी ५२ टक्के) याला म्हणतो, ‘‘आपल्याला झुक् झुक गाडीत बसून आबाबाप्पांना भेटायला जायचे आहे !’’
– सौ. श्रद्धा सुमित जोशी
‘प.पू. गुरुदेवा, या बाळाला तुमच्या चरणी सदैव असू द्या. त्याला राष्ट्र आणि धर्म यांसाठी कार्य करण्याची सद़्बुद्धी द्या’, अशी तुमच्या चरणी संपूर्ण शरणागत भावाने प्रार्थना आहे.’
– सौ. श्रद्धा सुमित जोशी आणि सौ. निलिमा कुलकर्णी (२४.११.२०२३)
बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |