इतरांना सात्त्विकतेचा लाभ व्हावा, यासाठी दैनंदिन कृती नामजपासह करा !
‘अध्यात्मशास्त्रानुसार शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात. या सिद्धांतानुसार आपल्या मनातील विचारांचाही आपल्या अवतीभवतीच्या परिसरावर परिणाम होत असतो, उदा. एखादी गृहिणी स्वयंपाक करत असेल, तर तिच्या मनातील विचारांचा परिणाम त्या पदार्थांवर होतो. चांगले विचार असतील, तर चांगला परिणाम होतो आणि अयोग्य विचार असल्यास त्याचा नकारात्मक परिणाम होतो. याच कारणास्तव स्वयंपाक करणे, केर काढणे, कपडे धुणे यांसारख्या कृती करतांना नामजप करणे अधिक आवश्यक असते; कारण इतर कोणत्याही विचारांपेक्षा नामजपाचा सूक्ष्म स्तरावरील परिणाम हा सर्वाधिक सकारात्मक असतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (३.३.२०२४)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |