साधकांमध्ये गुणवृद्धी करणारे सनातनचे चैतन्यदायी आश्रम !
सनातन आश्रम, देवद, पनवेल, जिल्हा रायगड, महाराष्ट्र
येथे पुढील कार्यालये आणि विभाग कार्यान्वित आहेत.
१. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या मुंबई आवृत्ती आणि पश्चिम महाराष्ट्र आवृत्ती यांचे कार्यालय
२. सनातनच्या ग्रंथांचा साठा, मागणी आणि पुरवठा केंद्र
३. सनातनच्या पूजोपयोगी आणि नित्योपयोगी सात्त्विक उत्पादनांचे वितरण केंद्र
सनातन आश्रम, मिरज, जिल्हा सांगली, महाराष्ट्र
येथून सांगली जिल्ह्यातील धर्मप्रसाराचे कार्य चालते.
भविष्यकाळातील नियोजन – वृद्ध झालेल्या साधकांसाठी सर्वत्र वानप्रस्थाश्रमांची स्थापना करणे
ज्या साधकांनी सर्वस्वाचा त्याग केला आणि साधना केली, अशांचे मन वृद्धपणी मुलाच्या घरी राहून नातवंडांशी खेळणे, घरात चालू असलेले दूरचित्रवाणीवरील कार्यक्रम पहाणे, मायेतील गप्पागोष्टी करणे इत्यादींत रमत नाही. त्यांना अध्यात्म, साधना यांविषयी बोलणे आणि साधना करणे हे सोडून अन्य सर्व नकोसे वाटते. अशा साधकांच्या सोयीसाठी प्रथम भारतातील प्रत्येक राज्यात आणि पुढे प्रत्येक जिल्ह्यात ‘वानप्रस्थाश्रम’ स्थापन करण्याचे ध्येय ठरवले आहे. ज्या साधकांनी आयुष्यभर साधना केली, त्यांची शेवटच्या श्वासापर्यंत काळजी घेणे आणि त्यांना साधनेत मार्गदर्शन करणे, हा यामागील हेतू आहे.
साधकांनी आश्रमातील प्रत्येक सेवा ‘साधना’ म्हणून करणे !
१. आश्रमांतील स्वयंशिस्त आणि नियोजनबद्धता
अ. सनातनच्या कुठल्याही आश्रमात प्रवेश केल्यावर स्वतःची पादत्राणे नीट मांडणीत ठेवणे, ध्यानमंदिरात नामजपाला बसणे, जेवल्यानंतर ताटात अन्न न टाकणे आदी सर्वच कृती शिस्तबद्धतेने केल्या जातात.
अ. आश्रमातील साधक दैनंदिन सेवा, व्यष्टी साधना, प्रासंगिक कार्यक्रम इत्यादी ठरलेल्या नियोजनानुसार पार पाडतात.
२. स्वच्छता आणि नीटनेटकेपणा
अ. आश्रमातील तरुण साधक प्रतिदिन न्यूनतम १ घंटा (तास) मन लावून आश्रमस्वच्छता (प्रसाधनगृहाची स्वच्छता करणे, परिसर झाडणे, लादी पुसणे आदी सेवा) करतात. त्याचप्रमाणे मासातून एकदा विभागातील संगणक आणि इतर सर्व साहित्य यांची, तसेच आश्रमातील मार्गिका (पॅसेज), भोजनकक्ष यांची एकत्रित स्वच्छता करतात. साधक आपापल्या निवासस्थानाची नियमितची आणि मासातून एकदा स्वच्छता होईल हे कटाक्षाने पहातात.
आ. आश्रमात काही दिवसांसाठी पाहुणे येणार असतील, तर त्यांना रहाण्यासाठी खोली देतांना खोलीत आवश्यक तेवढ्या सुविधा सिद्ध केल्या जातात. त्याचप्रमाणे त्यांच्यासाठी अंथरूण-पांघरूण यांची व्यवस्था केली जाते.
इ. इतर आश्रमांतून किंवा जिल्ह्यांतून साधक काही कालावधीसाठी आश्रमात रहायला येतात. त्यांचे पथ्यपाणी जाणून घेऊन त्याप्रमाणे त्यांना आहार दिला जातो.
ई. प्रत्येक वस्तू (उदा. कपाटातील ग्रंथ, धुतलेल्या ताट- वाट्या) त्या त्या स्थानी नीटनेटकेपणाने ठेवली जाते.
३. प्रत्येक कृती ‘सत्यं शिवं सुंदरम्’ (सात्त्विक) करणे
प्रत्येक कृतीतून चांगली स्पंदने यावीत, या उद्देशाने साधक प्रत्येक कृती सात्त्विक करण्याचा प्रयत्न करतात. सात्त्विक वेशभूषा करणे, स्वतःच्या कपाटातील वस्तूंची मांडणी चांगली दिसेल अशा पद्धतीने त्यातील खण लावणे, धान्य नीट वाळत घालणे, ही त्याची काही उदाहरणे आहेत.
४. लहान लहान गोष्टींतूनही काटकसरीपणा
आश्रमातील प्रत्येक वस्तू ही गुरूंची आहे, तसेच वीज, पाणी आदी गोष्टी राष्ट्रीय संपत्ती आहेत, या भावाने सर्व वस्तू काटकसरीने वापरल्या जातात. संगणकीय प्रतींसाठी पाठकोरे कागद वापरणे, लिखाणासाठी कागदाचे तुकडे वापरणे, ही त्याची काही उदाहरणे आहेत.
५. कुटुंबभावनेने एकमेकांच्या सुख-दु:खांत सहभाग
अ. साधकांचे वाढदिवस, विवाह, पंचाहत्तरी आदी कार्यक्रम आश्रमात धर्मशास्त्रानुसार आनंदाने पार पाडले जातात.
आ. कौटुंबिक अडचणी, दुःखाचे प्रसंग आदी समयीही साधक एकमेकांना तत्परतेने साहाय्य करतात.
६. रुग्ण-साधकांची मनःपूर्वक सेवाशुश्रूषा
अ. पथ्याचे जेवण आवश्यक असणार्या साधकांसाठी त्यांच्या आवश्यकतेनुसार स्वयंपाक बनवला जातो.
आ. साधक रुग्णाईत झाल्यास आश्रमातील साधक-डॉक्टर आणि अन्य साधक त्याची सेवा करतात. रुग्णाला घरी जावे लागत नाही.
७. साधनेची तळमळ आणि सर्वस्वाचा त्याग
अ. साधनेची तळमळ आणि सेवेची ओढ यांमुळे भारतातील विविध प्रांत अन् वयोगटांतील शेकडो साधक आश्रमजीवन स्वीकारतात.
आ. नोकरी-व्यवसाय, कौटुंबिक सुख आदींचा त्याग करून आलेले हे सर्व साधक आश्रमातील सर्व सेवा विनावेतन करतात.
८. जीवनातील प्रत्येक कृतीतून साधनेचा उद्देश !
पूजेसाठी परडीत काढलेल्या फुलांची सात्त्विक रचना केल्यास त्यातून भावाची स्पंदने निर्माण होऊन पूजा भावपूर्ण होते. कपाळावर कुंकू लावल्याने आचारधर्माचे पालन होते. भाजी चिरण्यासारखी प्रत्येक कृती करण्यामागेही काहीतरी शास्त्र आहे. ते समजून योग्य प्रकारे कृती केली, तर तिच्यातून साधना होते. कोणतीही कलाकृती सात्त्विक बनवल्यास त्यातून स्वतःला अन् इतरांनाही सात्त्विकता लाभते. अशा प्रकारे प्रत्येक कृतीतून साधना होण्यासाठी ती कृती परिपूर्ण, भावपूर्ण आणि सात्त्विकतेचा विचार ठेवून कशी करायची ? हे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी साधकांना शिकवले आहे.
९. आश्रमातील वाढत्या सात्त्विकतेची प्रचीती देणारे दैवी पालट !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चैतन्यदायी वास्तव्य, साधकांचा भक्तीभाव, राष्ट्र आणि धर्म यांविषयी अव्याहत चालणारे कार्य आणि साधनामय वातावरण यांमुळे आश्रमातील सात्त्विकता दिवसेंदिवस वाढतच आहे. आश्रमातील सात्त्विकतेची प्रचीती देणार्या दैवी पालटांची पुढे दिलेली काही उदाहरणे पाहिली, तर ईश्वर सनातनवर किती भरभरून कृपा करत आहे, याचा प्रत्यय येतो. आश्रमात जणू ईश्वरी राज्यच अवतरत असल्याचे हे सूचक आहे.
अ. साधकांच्या कृष्णभक्तीमुळे श्रीकृष्णाच्या चित्रात जिवंतपणा आला आहे.
आ. दाराच्या काचेत मूळ रेलिंगपेक्षाही रेलिंगचे प्रतिबिंब सुस्पष्ट दिसते.
इ. अनेक ठिकाणी लाद्यांवर ‘ॐ’ उमटले असून लाद्यांमध्ये प्रतिबिंबही दिसते.
(संदर्भ : संग्रहित माहिती)