मेंदूच्या शस्त्रकर्मानंतर सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या प्रकृतीत सुधारणा !
नवी देहली – ‘ईशा फाऊंडेशन’चे संस्थापक सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्यावर २० मार्चला मेंदूचे आपत्कालीन शस्त्रकर्म करण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असून ते बरे होत आहेत, असे देहलीच्या अपोलो रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे. ३ आठवड्यांपासून सद्गुरु जग्गी वासुदेव यांच्या मेंदूत रक्तस्राव होत होता आणि असाहाय्य वेदना होत होत्या, असे सांगण्यात आले. ईशा फाऊंडेशन ‘एक्स’वर पोस्ट करून लिहिले आहे की, सद्गुुरु बरे होत आहेत. सर्वांकडून मिळालेले प्रेम आणि पाठिंबा यांबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत.
सौजन्य India Today
सद्गुरु जग्गी वासुदेव यांनी मेंदूच्या शस्त्रकर्मानंतरचा स्वतःचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर पोस्ट केला होता. यात ते म्हणाले होते की, डॉक्टरांनी माझे डोके उघडून काहीतरी शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना काहीही सापडले नाही. डोके पूर्णपणे रिकामे होते; म्हणून त्यांनी ते बंद पुन्हा टाकले. आता मी ठीक आहे.