नांदेड, हिंगोली, परभणी जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के !
नांदेड – नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांतील काही भागांत २१ मार्चला सकाळी ६.०५ ते ६.२४ या कालावधीत भूकंपाचे ३ सौम्य धक्के जाणवले. हा भूकंप ४.५ रिक्टर स्केलचा असल्याचे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाने सांगितले. या भूकंपाचा केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूरपासून १५ किलोमीटर अंतरावर होता. काही ठिकाणी घरांच्या भितींना तडे गेल्याची प्राथमिक माहिती आहे. नागरिकांनी भीतीने घराच्या बाहेर धाव घेतली.