मुंबईतील मराठी मतदारांना गावाला जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न !
मुंबई – मुंबईमध्ये २० मे या दिवशी मतदान होणार आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये गावाला जाणार्यांना कसे थांबवायचे ? असा प्रश्न राजकीय पक्षांच्या नेत्यांसमोर आहे. या कालावधीत केवळ परप्रांतीय लोक मुंबईत असतात. मराठी मतदारांनी मुंबईत थांबावे, यासाठी स्थानिक सामाजिक माध्यमांतून राजकीय पक्षांद्वारे प्रबोधन करण्यात येत आहे. ‘मुलांची परीक्षा संपल्यावर लगेच गावाला जा; पण मतदानासाठी २० मेपूर्वी मुंबईत या’ किंवा ‘मतदान झाल्यानंतर गावाला जा’, असे आवाहन केले जात आहे.