कंदहार (अफगाणिस्तान) येथील बाँबस्फोटात ३० जण ठार !
कंदहार (अफगाणिस्तान) – येथील एका गजबजलेल्या बाजारात झालेल्या भीषण बाँबस्फोटात ३० जणांचा मृत्यू झाला असून मोठ्या संख्येने लोक घायाळ झाले आहेत. यांपैकी बहुतांश जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. या स्फोटाचा उद्देश तालिबानी सैनिकांना लक्ष्य करण्याचा होता, असे प्राथमिक अहवालातून समोर आले आहे. या स्फोटाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी गटाने घेतलेले नाही.
सौजन्य WION
प्रत्यक्षदर्शींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, हा स्फोट आत्मघातकी आक्रमण होते. तालिबानी सैनिकांसह अनेक लोक काबुल बँकेत पैसे काढण्यासाठी उभे असतांना ही घटना घडली.