मुंबई महापालिकेसह प्रशासकीय अधिकार्यांचे स्थानांतर
मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी भूषण गगराणी
मुंबई – महापालिकेच्या आयुक्तपदी वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर अतिरिक्त आयुक्तपदी अभिजीत बांगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महापालिकेच्या आयुक्त पदावरून इक्बालसिंह चहल यांना नुकतेच हटवण्यात आले होते. त्यामुळे ही जागा रिक्त होती. अभिजीत बांगर हे ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त होते. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रशासकीय सेवेतील अधिकार्यांचे स्थानांतर करण्यात येत आहे.
‘मेट्रो वुमेन’ अश्विनी भिडे यांचे ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या व्यवस्थापकीय संचालकपदी स्थानांतर करण्यात आले आहे. त्या मुंबई महापालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी होत्या. सौरभ राव हे आता ठाणे महापालिकेचे आयुक्त म्हणून कारभार पहातील. कैलाश शिंदे यांच्यावर नवी मुंबई महानगरपालिकेचे दायित्व सोपवण्यात आले आहे. बुलढाण्याच्या जिल्हाधिकारीपदी अंकित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगावच्या जिल्हाधिकारीपदी शुभम गुप्ता, तर धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून विशाल नरवडे यांना नेमण्यात आले आहे.