खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्यांदा निवडून आणा ! – भाजप
डोंबिवली – खासदार श्रीकांत शिंदे यांना तिसर्यांदा निवडून आणण्यासाठी कल्याण मतदारसंघात सिद्धता करा, असे आवाहन भाजपचे कॅबिनेट मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पदाधिकार्यांना केले. नुकत्याच येथे झालेल्या मेळाव्यात त्यांनी वरील आवाहन केले.
यापूर्वी कल्याण लोकसभेची निवडणूक भाजपच्या कमळ चिन्हावरच लढवावी, अशी आग्रही मागणी करणारे पत्र दिवा शहर भाजपच्या पदाधिकार्यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना दिले होते.
चव्हाण म्हणाले की, आचारसंहिता लागल्यापासून या मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे एकमेव महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मोदी आणि शिंदे हे दोघेही या वेळी तिसर्यांदा निवडून येतील.