मुंबईत निवडणूक भरारी पथकाला ७२ लाख रुपयांची रक्कम सापडली
रक्कम प्राप्तीकर विभागाच्या कह्यात
मुंबई – लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये रक्कम घाटकोपर पूर्व परिसरात एका गाडीतून पकडली. ही रक्कम प्राप्तीकर विभागाच्या कह्यात देण्यात आली आहे. या गाडीत दिलीप नाथानी आणि अतुल नाथानी हे दोघे होते. आपण प्राप्तीकराशी संबंधित काम करणारे असून सनदी लेखापाल असल्याचे त्यांनी सांगितले, तसेच वाशीतील एका बांधकाम व्यवसायिकाशी संबंधित ही रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले.