आदर्श घोटाळा प्रकरणात अंबादास मानकापे याला सहाव्यांदा अटक !
आरोपींना ३ दिवस पोलीस कोठडी !
छत्रपती संभाजीनगर – आदर्श समूहाच्या घोटाळ्यातील ४ प्रमुख आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने ‘आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थे’तील १३ कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी पुन्हा अटक केली आहे. न्यायालयाने या आरोपींना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आतापर्यंत विविध घोटाळ्यांच्या गुन्ह्यात ४ आरोपींना सहाव्यांदा अटक झाली आहे. मुख्य आरोपी अंबादास मानकापे, सुनील मानकापे, वनिता पाटील, सविता अधाने अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
‘पतसंस्थेतील ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखेत आपल्या बँक खात्यांचा तपशील द्यावा. यावरून अन्वेषणात साहाय्य होईल’, असे आवाहन पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी ठेवीदारांना केले आहे. लेखापरीक्षक अमानउल्ला पठाण यांनी आदर्श महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे वर्ष २०२२ ते २०२३ या कालावधीचे लेखापरीक्षण केले होते. त्यानंतर या प्रकरणी आरोपींवर गुन्हे नोंदवले होते.