पुणे विद्यापिठामध्ये एका व्यक्तीला एकच पद देण्याची विद्यापीठ अधिसभा सदस्यांची मागणी !
पुणे – समन्वयकपदांचा कार्यभार केवळ ७ प्राध्यापकांकडे सोपवण्यात आला आहे, तसेच काही विभागप्रमुखांकडे चार-चार विभागांच्या प्रमुखपदाचे दायित्व देण्यात आले आहे. परिणामी नवीन नेतृत्व मिळण्याच्या प्रक्रियेला खीळ बसत आहे. त्यामुळे एका व्यक्तीला एकच पद देण्याचा धोरणात्मक निर्णय विद्यापिठाने घ्यावा, अशी मागणी अधिसभा सदस्यांकडून करण्यात आली आहे. (अशी मागणी का करावी लागते ? – संपादक)
विद्यापिठाच्या अधिसभेची बैठक २४ मार्च या दिवशी होणार आहे. त्यात विविध प्रस्ताव सादर केले जाणार आहेत. विद्यापिठात २०० हून अधिक अनुभव असणारे अध्यापक बर्याचशा विभाग आणि केंद्र येथे उपलब्ध आहेत; परंतु त्यांना डावलून केवळ ११ अध्यापकांकडे ४० विभागांचा पदभार सोपवण्यात आला आहे. यामुळे अनेकांना दिलेल्या दायित्वाला न्याय देणे शक्य होत नाही. त्याचा विद्यापिठाच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. विद्यापिठात होणारे सत्तेचे केंद्रीकरण थांबवावे, अशी मागणी अधिसभा सदस्य हर्ष जगताप यांनी केली आहे.