नागपूर येथे व्यंकटेश्वर महास्वामी यांच्याकडून प्रथम उमेदवारी आवेदन प्रविष्ट !
नागपूर – लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ५ मतदारसंघांत निवडणुका होणार आहेत. उमेदवारी आवेदन भरण्याच्या पहिल्याच दिवशी कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्याच्या चडचड येथील व्यंकटेश्वर महास्वामी उपाख्य दीपक कटकधोंड यांनी आवेदन प्रविष्ट केले आहे. यंदाच्या निवडणुकीतील महाराष्ट्रातील हे पहिलेच उमेदवारी आवेदन आहे.
व्यंकटेश्वर महास्वामी यांनी ‘सोलापूर जिल्ह्यातून आपल्याला उमेदवारी देण्यात यावी’, अशी मागणी भाजपकडे केली आहे; मात्र माझे हे प्राथमिक स्वरूपातील आवेदन असून आपण भाजपचे नेते नितीन गडकरी यांच्यासाठी मतदान मागणार आहे’, असे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. भाजपने नागपूर येथून नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे.