वडगाव मावळ (पुणे) येथील तलाठ्यास लाच घेतांना अटक !
पुणे – भूमीच्या ७/१२ उतार्यावरील गटाची फोड केल्याची नोंद करण्यासाठी वडगाव मावळ गावाचा तलाठी सखाराम दगडे याने ५० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. त्या लाचेचा पहिला हप्ता घेतांना दगडे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. दगडे याच्यावर वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी ४० वर्षीय शेतकर्याने तक्रार प्रविष्ट केली होती.
संपादकीय भूमिकाभ्रष्टाचाराने पोखरलेली प्रशासकीय यंत्रणा ! |