नांदेडची युक्ता बियाणी सर्वांत लहान वयाची भारतीय स्त्री वैमानिक !
नांदेड – येथील अवघ्या १९ वर्षीय युक्ता बियाणी हिने व्यावसायिक वैमानिक होण्यासाठीचे प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक होण्याचा बहुमान मिळवला आहे. बालपणापासून वैमानिक बनण्याचे तिचे स्वप्न होते. योग्य शैक्षणिक नियोजन करून तिने हे स्वप्न साकार केले आहे. बारावीनंतर मुंबई येथे ६ मास तिने विमान चालवण्याचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर बारामती येथील फ्लाईंग स्कूलमध्ये पुढील शिक्षणासाठी तिची निवड झाली. या प्रशिक्षणाच्या काळात तिने २०० घंटे विमान चालवले. ‘एअर इंडिया’मध्ये तिची नियुक्ती होईल, असा तिला विश्वास वाटतो.
नांदेडमधील अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावातील रेवा जोगदंड ही अमेरिकेत स्थायिक असून तिने १४ व्या वर्षीच अमेरिकेत विमान उडवण्याचा विक्रम केला होता. तिने अमेरिकेच्या नौदल हवाई पथकात फ्लाईट कमांडर पद मिळवले आहे. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये मूळची जम्मू-काश्मीरची मुंबईत असलेली आएशा अझिझ २१ व्या वर्षी वैमानिक झाली आहे.