साधिकेच्या चेहर्याकडे पाहून अन्य एका साधिकेला चांगले वाटणे आणि त्याचे साधिकेने सांगितलेले कारण
‘एकदा माझ्यात आणि कु. हर्षदा दातेकर (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ३८ वर्षे) यांच्यात पुढील संभाषण झाले.
कु. हर्षदा दातेकर : ‘तुमच्या मनात इतरांविषयी फारसे काही जाणवत नाही’, असे तुमच्याकडे पाहिल्यावर वाटते. तुमचे मन शांत आहे ना ?
मी : हो.
कु. हर्षदा दातेकर : ‘तुम्ही हे कसे काय साध्य केले ?’, ते मला सांगा ना !
मी : हे तुझ्या कसे लक्षात आले ?
कु. हर्षदा दातेकर : मी प्रतिदिन तुम्हाला पहाते. ‘काही साधकांच्या मनात पुष्कळ विचार आहेत’, असे मला जाणवते. तसे त्यांच्या चेहर्यावरही उमटते; पण तसे तुमच्या चेहर्यावर जाणवले नाही.
मी : मला रामनाथी आश्रमात रहाता येत असल्याबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटते. पूर्वी मलाही हे सर्व जमत नव्हते; परंतु आता साधकांविषयी पुष्कळ प्रेम वाटते. माझ्यामध्ये जसे स्वभावदोष आहेत, तसे समोरच्या साधकामध्येही आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले हे त्या साधकाला स्वभावदोषांसहित सांभाळत आहेत; तसेच ते मलाही माझ्या स्वभावदोषांसहित सांभाळत आहेत. त्यामुळे साधकांचे स्वभावदोष न पहाता मला त्यांचे गुण पहायचे आहेत.
‘प्रत्येक साधक समोर आल्यानंतर तो परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा साधक आहे’, असे मला वाटते. त्यामुळे ‘त्या साधकामध्ये गुरुरूप पहायचे आहे’, हे माझ्या लक्षात येते आणि ‘ती आठवणही देवच करून देतो’, असे मला वाटते. त्यामुळे मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच मला हे सर्व अनुभवता येते’, याबद्दल त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६२ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.४.२०२३)