सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !
सध्याचा काळ वाईट असल्याने साधना वाढवणे, हाच एकमेव उपाय असणे
श्री. संतोष गोसावी (लासलगाव, नाशिक) : आपले कार्य वाढत आहे; पण साधकांना होणारे त्रासही वाढत आहेत.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : आताचा काळ हा वाईट काळ आहे. ‘आपण आपला नामजप आणि साधना वाढवणे’, हाच यावर एकमेव उपाय आहे.
देवाविषयी सर्वांना प्रेम वाटते, तसे आपल्याविषयी सर्वांना प्रेम वाटायला हवे !
कु. मानसी गोसावी : मला माझ्या बाबांची (श्री. संतोष गोसावी यांची) पूर्वी भीती वाटायची; मात्र आता प्रसंग मोकळेपणाने बोलता येतात.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : अन्य साधकांनाही भीती वाटते का ? देवाविषयी कुणाला भीती वाटते का ? प्रेमच वाटते ! तशी आपली प्रगती व्हायला हवी.
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |