महाराष्ट्रात मागील निवडणुकीत ४ लाख ७७ सहस्र मतदारांनी वापरला होता नोटाचा पर्याय !
मुंबई – वर्ष २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघांतील एकूण ४ लाख ७७ सहस्र २८९ मतदारांनी ‘नोटा’ (निवडणुकीला उभे राहिलेल्या सर्व उमेदवारांना नाकारत असल्याचा मतदारांसाठी असलेला पर्याय) हा पर्याय वापरला होता. यामध्ये नक्षलग्रस्त गडचिरोली-चिमूर या मतदारसंघामध्ये तब्बल २४ सहस्र ५९९ जणांनी ‘नोटा’चा वापर केला. या मतदारसंघात भाजपचे अशोक नेते हे विजयी झाले. महाराष्ट्रात पालघर मतदारसंघात सर्वाधिक २९ सहस्र ४७९ मतदारांनी नोटा हा पर्याय वापरला होता. महाराष्ट्रात रामटेक मतदारसंघात सर्वांत अल्प १ सहस्र ४२१ मतदारांनी ‘नोटा’ पर्याय वापरला. या मतदारसंघात शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाणे हे उमेदवार विजयी झाले होते.