मुंबई विमानतळावर २ विदेशी महिला तस्करांसह नायजेरियन तस्कर अटकेत !
मुंबई – येथील विमानतळावर २ विदेशी महिला संशयित तस्करांना अटक करून त्यांच्याकडून ९.८९२ किलो कोकेन जप्त करण्यात आले. त्याची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक आहे. यानंतर देहली येथून एका नायजेरियन अमली पदार्थ विक्रेत्यालाही अटक करण्यात आली आहे. हे पदार्थ देहली आणि देशातील अन्य भागांत पोचवण्याची व्यव्यथा हे दोघे पहायचे. अटक केलेल्या महिला या इंडोनेशिया आणि थायलंड देशांच्या नागरिक आहेत. त्या इथिओपियातील अदिस अबाबा येथून भारतात प्रवास करत होत्या.
अटक करण्यात आलेल्या नायजेरियातील अमली पदार्थ विक्रेत्याने भारतीय अधिकार्यांशी धक्काबुक्की केली. (असे दुःसाहस करणार्यांच्या विरोधात सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक ! – संपादक) यात अधिकार्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. अटक केलेल्या तिघांवर गुन्हा नोंद आहेत. तस्करीचे हे जाळे इथिओपिया, श्रीलंका, नायजेरिया आणि भारत येथेच कार्यरत असल्याचे समजते.
संपादकीय भूमिकाभारतातील अमली पदार्थांच्या तस्करीचे जाळे नष्ट करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलणे आवश्यक ! |