हिंदूंवर आक्रमण करणार्या संशयित आरोपीचे ५ मजली बेकायदेशी घर तोडा ! – मंगलप्रभात लोढा, पालकमंत्री
|
मुंबई – जरीमरी, साकीनाका येथे एका कट्टरपंथियाने धार्मिक तेढ निर्माण करून स्थानिक हिंदु कुटुंबावर जीवघेणे आक्रमण केले होते. यात ५ हिंदू गंभीर घायाळ झाले आहेत. पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पीडित कुटुंबाची चौकशी केली. मंत्री लोढा यांनी संशयित व्यक्तीचे बेकायदेशीररित्या उभे केलेले ५ मजली घर तोडण्याचे निर्देश दिले. महापालिकेने त्याप्रमाणे कारवाई चालू केली असून घराचा केवळ तळमजलाच पाडणे शेष आहे.
सौजन्य Gallinews India
पालकमंत्री लोढा म्हणाले, ‘‘येथे हिंदूंचा छळ केला जात आहे. मालवणी येथेही असाच प्रकार झाला होता. हे बंद झाले पाहिजे. यासाठी योग्य ती कारवाई करू. येथील भूमीपुत्रांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही.’’
संबंधित संशयिताने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भिंतीला लागून ५ मजली अनधिकृत बांधकाम केले आहे. त्याच्या लगत असणार्या मंदिरात नित्य पूजा करणार्या हिंदूंना त्याने त्रास दिला होता. नागरिकांनी या प्रकरणी पोलिसांत ४० तक्रारी प्रविष्ट करूनही पोलिसांनी याकडे कानाडोळा केला.
संपादकीय भूमिका
|