तुम्ही ईडीसमोर उपस्थित का होत नाही ? – उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री केजरीवाल यांना प्रश्न
देहली उच्च न्यायालयाने मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी ईडीकडून मागवले उत्तर !
नवी देहली – देहली उच्च न्यायालयाने देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या मद्य घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाला (‘ईडी’ला) समन्स बजावले. न्यायालयाने ईडीला तिची बाजू मांडण्यासाठी २ आठवड्यांची मुदत दिली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी २२ एप्रिलला होणार आहे. न्यायालयाने या वेळी केजरीवाल यांच्या अधिवक्यांना विचारले, ‘तुम्ही (केजरीवाल) ‘ईडी’समोर का उपस्थित होत नाही ? तुम्ही देशाचे नागरिक आहात, समन्स केवळ तुमच्यासाठी आहेत.’ यावर मुख्यमंत्र्यांच्या अधिवक्त्यांंनी सांगितले की, ईडीने आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांना अटक केली आहे. ईडी केजरीवाल यांनाही अटक करू शकते. ते पळून जात नाहीत; पण त्यांना संरक्षण मिळाले, तर ते शरण येतील.
सौजन्य Bharat 24
Delhi High Court seeks ED's reply in Liquor Scam case
Why do you not appear in front of the ED ? – HC Bench raps Chief Minister Arvind Kejriwal#DelhiLiquorScam #DelhiHighCourt #ArvindKejriwal #EnforcementDirectorate
Picture Courtesy –@LiveLawIndia pic.twitter.com/TVI2F3gcqp
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 20, 2024