भारतविरोधी घोषणा देणार्यांवरील आरोपपत्र रहित करण्यास अलाहाबाद उच्च न्यायालयाचा नकार !
वाराणसी – अलाहाबाद उच्च न्यायालयाने मंदिरात धार्मिक प्रवचन चालू असतांना भारतविरोधी घोषणा दिल्याच्या प्रकरणी तिघांच्या विरोधातील आरोपपत्र रहित करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती सुभाष विद्यार्थी यांच्या खंडपिठाने आरोपींना दिलासा देण्यास नकार देतांना सांगितले की, दुसर्या देशाची स्तुती करणे आणि आपल्या देशाविरुद्ध घोषणा देणे, तसेच धार्मिक प्रवचनाला उपस्थित असलेल्या लोकांना शिवीगाळ करून त्यांना धमकावणे हे योग्य नाही.
फैजान अहमद, इद्रीसी फैजान, शमशाद अहमद आणि इतर आरोपी जुलै २०१७ मध्ये धार्मिक प्रवचन चालू असतांना मंदिराच्या आवारात घुसले आणि त्यांनी दुसर्या पाकिस्तानचा जयजयकार करत भारताच्या विरोधात घोषणाबाजी चालू केली होती. त्यांनी तिथे उपस्थित लोकांना धमकावले. या आरोपींच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ आणि ५०६ च्या अंतर्गत आरोपपत्र प्रविष्ट (दाखल) करण्यात आले होते. आरोपींना तात्काळ अटक करण्यात आली होती.