मणेरवाडी (पुणे) येथे १५ वर्षीय मुलाची हत्या !
दोन आक्रमणकर्तेही अल्पवयीन सर्वजण एकाच शाळेतील विद्यार्थी !
पुणे – मैत्रीतून झालेल्या चुकीच्या समजुतीतून २ अल्पवयीन मुलांनी प्रकाश राजपूत या १५ वर्षीय शाळकरी मुलाची कोयत्याने वार करून हत्या केली. ही घटना मणेरवाडी (खानापूर, सिंहगड पायथा) परिसरातील आनंदवन सोसायटीमध्ये १८ मार्च या दिवशी दुपारी घडली. प्रकाश हा खानापूर येथील महात्मा गांधी विद्यालयामध्ये इयत्ता ९ वीमध्ये शिकत होता. त्याची आई सोसायटी परिसरामध्ये काम करते. त्याच सोसायटीच्या कामगारांच्या खोलीमध्ये तो आई, भावासह रहात होता. शाळेतून आल्यानंतर नेहमीप्रमाणे तो झोपला होता. तेव्हा आक्रमणकर्त्यांनी त्याच्या डोक्यात कायेत्याने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. (धर्मशिक्षणाच्या अभावी मुलांमधील आक्रमकता वाढत चालली आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकाअल्पवयीन गुन्हेगारांचे दिवसेंदिवस समाजात वाढत चाललेले प्रमाण लक्षात घेऊन प्रशासनाने शाळांमध्ये विशेष जागृती करणे आवश्यक ! |