पुणे येथील ससूनच्या अधिकार्याच्या विरोधात राज्य माहिती आयोगाची शिस्तभंगाची कारवाई !
माहिती लपवणे आणि खोटी माहिती पुरवल्याचे प्रकरण !
पुणे – कोरोना महामारीच्या काळामध्ये ‘ससून सर्वोपचार रुग्णालया’मध्ये कर्मचार्यांनी वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा केला. याविषयी माहिती अधिकाराच्या अंतर्गत माहिती मागवली असता, त्या वेळचे सी.सी.टी.व्ही. वरील चित्रीकरण काढून टाकले आहे, अशी खोटी माहिती पुरवल्याविषयी ‘ससून’च्या मुख्य प्रशासकीय अधिकार्यांविरोधात शिस्तभंगाची कारवाई ‘राज्य माहिती आयोगा’कडून करण्यात आली आहे. याविषयी शाहीद रजा बर्नी यांनी ‘राज्य माहिती आयोगा’कडे तक्रार प्रविष्ट केली होती. (खोटी माहिती देणार्या अधिकार्याला त्वरित बडतर्फ करणे आवश्यक ! – संपादक)
संपूर्ण प्रकरणाची पडताळणी केल्यानंतर ससून रुग्णालयातील मुख्य प्रशासकीय अधिकारी गणेश बडदरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली. ‘२५ सहस्र रुपये दंड आणि १ मासाच्या आत कारवाई का करू नये ? याचे उत्तर आयोगाला सादर करावे’, असे आदेश राज्य माहिती आयोगाच्या आयुक्तांनी दिले आहेत.