कोंढवा पशूवधगृहाचे खासगीकरण अवैध आणि रहित करण्याचे अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना निवेदन !
पशूवधगृहांचे खासगीकरण हे दूध भेसळीचे प्रमुख कारण ! – मिलिंद एकबोटे, अध्यक्ष, अखिल भारतीय गाय संरक्षण संघ
पुणे – पशूवधगृहांचे खासगीकरण हे समाजासाठी घातक असून ते दूध भेसळीचे प्रमुख कारण आहे, असे अखिल भारतीय गाय संरक्षण संघाचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी सांगितले. पुण्ो येथील कोंढवा पशूवधगृहाचे खासगीकरण करण्यास पालिका अधिकार्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे कोंढवा पशूवधगृहाचे खासगीकरण अवैध आणि रहित करण्याचे निवेदन मिलिंद एकबोटे अन् गणेश मंडळांचे अधिकारी यांच्यासह स्थानिक नागरिकांनी अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांना दिले.
या वेळी पू. आचार्य विरागसागरजी म.सा. आणि पू. वाणीभूषण प्रीतिसुधाजी म.सा. यांच्या प्रेरणेने गणेश मंडळांचे सदस्य-कार्यकर्ते, मिलिंद एकबोटे आणि समस्त महाजनचे महाराष्ट्र समन्वयक रमेश ओसवाल यांच्यासह समस्त हिंदी आघाडी, अखिल भारतीय कृषी गाय सेवा संघ, समस्त महाजन, गोरक्षण सामाजिक संस्था, शिव प्रतिष्ठान, हिंदुस्थान शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेवा, अखिल कोंढवा खुर्द ग्रामस्थ, भाजप (अनुसूचित जाती मोर्चा), जैन प्रकोष्ठ, श्री राधेकृष्ण लीलावती गोशाळा आणि आचार्य विनोबा भावे गोशाळा, कोयाळी यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
१८ मार्च या दिवशी अतिरिक्त आयुक्तांच्या निवेदनासह कोंढवा येथील ४ सहस्र नागरिक आणि ३० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या अधिकार्यांनी मा. आयुक्त, महापालिका यांना निषेधाचे पत्रही दिले आहे. यांसह या पशूवधगृहाविषयी कोंढवा पोलीस ठाण्यात ५० एफ्.आय.आर्. प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. त्याच्या प्रतीही या वेळी देण्यात आल्या. प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायद्यात स्पष्टपणे शेती योग्य, दुग्धोत्पादन आणि प्रजनन क्षमता योग्य जनावरांच्या कत्तली करू नयेत, असे नमुद केले आहे.