पुणे जिल्ह्यात उपजिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन सादर !
होळी-रंगपंचमीनिमित्त हिंदु जनजागृती समितीची ‘संस्कृती रक्षण’ मोहीम !
पुणे, १९ मार्च (वार्ता.) – होळी-रंगपंचमीच्या निमित्ताने होणार्या अपप्रकारांना आळा बसावा, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी सहकार्य मिळावे, या मागणीसाठी १८ मार्च या दिवशी हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ यांच्या वतीने पुणे येथे उपजिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, तसेच खडकवासला कालवा विभाग यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ‘खडकवासला जलाशय रक्षण मोहिमे’च्या २१ वर्षांच्या यशस्वीतेविषयी समितीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना अवगत केले. या वेळी समितीचे श्री. कृष्णाजी पाटील, श्री. प्रशांत मुकादम आदी उपस्थित होते. या मोहिमेचे यंदाजे २२ वे वर्ष आहे.
१. विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त श्री. हिम्मत जाधव यांना निवेदन देण्यात आले. निवेदनातील सूत्राविषयी जाधव यांना अवगत केले असता ‘दोन्ही उपक्रम पुष्कळ छान आहेत, याकरता योग्य त्या कार्यवाहीसाठी निवेदन तत्परतेने पुढे पाठवतो, तसेच माझ्याकडून जे सहकार्य अपेक्षित आहे ते अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करीन’, असे त्यांनी सांगितले.
२. पुण्याचे राखीव उपजिल्हाधिकारी श्री. नामदेव टिळेकर यांना निवेदन देण्यात आले. व्यस्तता असतांनाही स्वतःहून येऊन तत्परतेने निवेदन स्वीकारले. निवेदनातील सूत्रांचे विवेचन समितीच्या माध्यमातून केले असता ‘या दोन्ही निवेदनांवर तत्परतेने कार्यवाही करू’, असे टिळेकर यांनी सांगितले. तसेच अन्य ठिकाणी निवेदन देण्यात आले.
३. खडकवासला जलाशय रक्षणासाठी आवश्यक ते सहकार्य मिळण्याविषयी निवेदन अधीक्षक अभियंता, पुणे पाटबंधारे विभाग पुणे आणि कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे यांना देण्यात आले.