सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यामुळे धर्माभिमान्यांचे शस्त्रकर्म उत्तम होणे
‘वर्ष २०२३ मधील गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझे मित्र श्री. अभिजीत विलास मेथे यांना हुपरी येथे अपघात झाला. त्यांच्या पायाचे हाड मोडल्यामुळे त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात शस्त्रकर्म करण्यासाठी भरती केले. तेव्हा माझे मित्र श्री. स्वप्नील सौदे यांनी त्यांना ४.४.२०२१ या दिवसाच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लेखातील अस्थीभंगानंतर हाड जुळून येण्यासाठीचा नामजप सांगितला.
दत्तभक्त श्री. अभिजीत यांनी तो नामजप चालू केला. त्यांचे शस्त्रकर्म झाले. शस्त्रकर्म झाल्यावर त्यांची ‘क्ष’ किरण चाचणी (एक्स रे) करण्यात आली. त्याचा अहवाल पाहून आधुनिक वैद्य आम्हाला म्हणाले, ‘‘मी प्रथमच एवढे उत्तम शस्त्रकर्म झालेले पहात आहे.’’
असा हा सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजपाचा महिमा !’
– श्री. विशाल विठ्ठल ठोके, हुपरी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर. (२१.७.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |