रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिराच्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती
‘जुलै २०२२ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात मी सहभागी झाले होते. त्या वेळी मला आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
१. त्रासदायक अनुभूती
अ. मला शिबिराच्या तिसर्या दिवशी शारीरिक त्रास हाेत होता. त्या वेळी ‘मी रामनाथी आश्रमात साक्षात् भूवैकुंठात येऊनही शिबिराचा पूर्ण लाभ घेऊ शकत नाही’, असे वाटून मला निराशा आली होती.
आ. मला शिबिराच्या पाचव्या दिवशीही त्रास होत होता. त्या दिवशी मला त्रासामुळे आश्रमात जाता आले नाही. त्यामुळे मला पुष्कळ खंत वाटत होती. माझे मन निराश झाले होते.
२. चांगल्या अनुभूती
अ. ‘शिबिराच्या पहिल्या दिवशी सौ. वैष्णवी बधाले (पूर्वाश्रमीच्या कु. वैष्णवी वेसणेकर, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय २४ वर्षे) स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलन प्रक्रियेविषयी सांगत होत्या. तेव्हा मला सूक्ष्म गंध आला. माझ्या हातावर दैवी कण दिसला.
आ. मला शिबिराच्या तिसर्या दिवशी आलेली निराशा मी पू. दीपाली मतकर (सनातनच्या ११२ व्या समष्टी संत, वय ३५ वर्षे) यांच्याशी बोलल्यावर दूर झाली. मला हलकेपणा जाणवू लागला. मी रुग्णाईत असतांना ज्या खोलीत होते, तेथील प्रत्येक वस्तूत मी गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे) अस्तित्व अनुभवत होते. ‘मी गुरुदेवांच्या खोलीत त्यांच्या चरणांपाशी बसले आहे’, असे मला सतत जाणवत होते.
इ. मला शिबिराच्या पाचव्या दिवशी त्रास होत असल्याने निराशा आली असतांना मी पू. दीपाली मतकर यांच्याशी बोलले. त्यांनी सांगितल्यानुसार मी देवाला आर्ततेने हाक मारून भावजागृतीचा प्रयोग केला. नंतर माझ्या लक्षात आले, ‘माझ्या डाव्या हाताची त्वचा चमकत आहे.’ मला वाटले, ‘माझ्या हातावरील लहान दैवी कणांच्या माध्यमातून साक्षात् गुरुदेवच मला ‘मी सूक्ष्म रूपात तुझ्या समवेत आहे’, असे सांगत आहेत.’ त्या वेळी माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली.’
– कु. सावित्री गुब्याड, सोलापूर (२.८.२०२२)
|