पू. (श्रीमती) विजया पानवळकर (वय ८४ वर्षे) संत झाल्यापासून घरात चैतन्य जाणवून भीती न वाटणे
देवरुख, जिल्हा रत्नागिरी येथील पू. विजया पानवळकर (सनातनच्या १२६ व्या (व्यष्टी) संत) यांचा आज फाल्गुन शुक्ल एकादशी (२०.३.२०२४) या दिवशी ८४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या सुनेला आलेली अनुभूती येथे देत आहोत.
पू. (श्रीमती) विजया पानवळकरआजी यांच्या चरणी ८४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार ! |
‘पूर्वी मला देवरुखला घरी खोलीत एकटी झोपतांना थोडी भीती वाटायची; परंतु सासूबाई (पू. विजया पानवळकर (सनातनच्या १२६ व्या (व्यष्टी) संत, वय ८४ वर्षे)) संत घोषित झाल्यापासून घरातील चैतन्य एवढे वाढले आहे की, ‘आता मी खोलीत एकटी आहे’, याची मला जाणीवही होत नाही. आता घर भरल्यासारखे वाटते आणि मनाला पुष्कळ चांगले वाटते.’
– सौ. नेहा विनय पानवळकर, (पू. विजया पानवळकरआजींची सून) देवरुख, रत्नागिरी. (४.११.२०२३)
|