Bangladesh Hindu Attacked : बांगलादेशात सत्ताधारी पक्षाच्या विद्यार्थी नेत्याकडून हिंदु ढाबा चालकावर प्राणघातक आक्रमण !
सिलहट (बांगलादेश) – येथे रमझानच्या काळात राजीव कुमार डे या हिंदूने त्याचा ढाबा उघडा ठेवल्याने त्याच्यावर धर्मांध मुसलमानांनी प्राणघातक आक्रमण केले. तसेच त्याच्याकडील पैसे लुटले. सोहेल हुसैन नावाच्या मुसलमानाने त्याच्या साथीदारांसह हे आक्रमण केले. सोहेल हुसैन बांगलादेशातील सत्ताधारी अवामी लीगची विद्यार्थी संघटना ‘छात्र लीग’चा नेता असल्याचे सांगितले जाते. रमझाननिमित्त राजीव कुमार यांच्याकडे त्यांनी वर्गणी मागितली होती. राजीव कुमार याने त्याला नकार दिल्याने हे आक्रमण केल्याचेही सांगितले जात आहे. ही घटना १५ मार्च या दिवशी घडली.
Hindu restaurant owner Rajeev dey fatally attacked by Jihadi mob for keeping restaurant open in Sylhet during Roza days in Ramadan. pic.twitter.com/kQuPj9FyKD
— Voice of Bangladeshi Hindus 🇧🇩 (@VoiceofHindu71) March 16, 2024
संपादकीय भूमिकासत्ताधारी पक्षाच्या पंतप्रधान शेख हसीन यांचे भारताशी जवळचे संबंध असतांनाही बांगलादेशात हिंदूंची ही स्थिती आहे. यावरून शेख हसीना यांचा तेथील हिंदूंना कोणताही आधार नाही, हेच स्पष्ट होते ! |