Britain Ban Khalistani Organization : ब्रिटन खलिस्तानी संघटना आणि दूरचित्रवाहिनी यांवर बंदी घालणार !
भारतीय उच्चायुक्तालयावरील आक्रमणाचे प्रकरण
लंडन (ब्रिटन) – ब्रिटन सरकार त्यांच्या देशात भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी आलेल्या ‘इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन’ (आय.एस्.वाय.एफ्.), खालसा टेलिव्हिजन लिमिटेड आणि काही व्यक्ती यांवर बंदी घालणार असल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने सिद्धता केली आहे. गेल्या वर्षी लंडनमध्ये भारतीय उच्चायुक्तालयावर खलिस्तान्यांनी आक्रमण केले होते. त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.
१. इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन या संघटनेवर ब्रिटनने यापूर्वी बंदी घातली होती; मात्र वर्ष २०१६ मध्ये ती उठवण्यात आली. हिंदु आणि भारतीय सरकारी अधिकारी यांना लक्ष्य करून त्यांच्या हत्या, बाँबस्फोट आणि अपहरण केल्याचा या संघटनेवर आरोप होता.
२. खालसा टेलिव्हिजन लिमिटेडवर फेब्रुवारी २०२१ मध्ये ५० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. तसेच तिचा परवाना रहित करण्यात आला. सध्या ही संघटना सामाजिक माध्यमांतून सक्रीय आहे.
संपादकीय भूमिकामागील वर्षी झालेल्या आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इतक्या विलंबाने कारवाई का ? |