Rajasthan Train Accident : अजमेर (राजस्थान) येथे झालेल्या रेल्वे अपघाताला चालकांमधील वाद कारणीभूत !
अजमेर (राजस्थान) – येथे १७ मार्चला सायंकाळी झालेल्या साबरमती-आग्रा सुपरफास्ट एक्सप्रेसच्या अपघाताविषयीचे कारण समोर आले आहे. लोको पायलट (चालक) आणि सहाय्यक लोको पायलट यांच्यामध्ये रेल्वेच्या वेगावरून भांडण झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती या दोघांनी चौकशीत दिली आहे. भांडणामुळे हे दोघेही सिग्नलच्या वेळी ब्रेक लावायला विसरले. गाडीचा वेग प्रती घंटा ९० किलोमीटर असतांना त्यांनी ब्रेक लावला आणि गाडी मालगाडीला धडकली. यामुळे काही डबे रुळावरून घसरले. यामुळे अनेक गाड्या रहित कराव्या लागल्या होत्या. या अपघातात ३ जण घायाळ झाले होते.
संपादकीय भूमिकाप्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण करणार्या अशा चालकांवर गुन्हा नोंदवून त्यांना कारागृहात टाकले पाहिजे ! |