मुंबईतील वर्ष १९९२ आणि १९९३ च्या घटनांमधील पीडितांच्या वारशांना हानीभरपाई देणार !
राज्य सरकारचा निर्णय !
मुंबई – वर्ष १९९२ मधील जातीय दंगल आणि वर्ष १९९३ च्या मुंबईतील साखळी बाँबस्फोटात मृत पावलेल्या किंवा बेपत्ता झालेल्या व्यक्तींच्या कायदेशीर वारसांना हानीभरपाई देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या दोन्ही घटनांतील पीडितांच्या नातेवाईकांनी शहर आणि उपनगरांतील जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्याचे आवाहन सरकारने १४ मार्च या दिवशी अधिसूचनेद्वारे केले आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, राज्य सरकारने या दोन्ही घटनांतील मृत आणि बेपत्ता लोकांच्या वारसांना २ लाखांची हानीभरपाई जाहीर केली. सरकारने सर्व ९०० मृत आणि ६० बेपत्ता व्यक्तींच्या कायदेशीर वारशांना भरपाई दिली आहे; मात्र इतर हरवलेल्या व्यक्तींचे वारस भरपाई करण्यासाठी सापडलेले नसल्याचे समजते.