सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांत दौरा !
सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने…
सनातन संस्था
सोलापूर – सनातन संस्थेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांचा सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यांत दौरा पार पडला. यानिमित्ताने विविध वृत्तपत्रांचे कार्यालय आणि न्यूज चॅनल यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतींच्या माध्यमातून ‘संस्थेच्या कार्याचा विस्तार, संस्थेच्या कार्याला समाजाचा वाढता प्रतिसाद, तणावमुक्तीसाठी आनंदी जीवन कसे जगावे ?’, यांसारख्या विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यासमवेतच श्री. राजहंस यांनी पत्रकार, संपादक, उद्योजक यांच्या भेटीही घेतल्या.
१. सोलापूर येथील ‘९५ माय एफ्.एम्.’ या रेडिओवर श्री. चेतन राजहंस यांची मुलाखत झाली. ‘युवकांनी सध्याच्या धकाधकीच्या जीवनात तणावग्रस्त परिस्थितीवर मात कशी करावी ?’, या विषयावर ‘आर्.जे.’ (रेडिओ जॉकी – रेडिओवरील निवेदक) श्रद्धा यांनी ही मुलाखत घेतली.
२. दैनिक ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयामध्ये श्री. चेतन राजहंस यांना संवाद साधण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. या वेळी मुख्य संपादक श्री. नितीन फलटणकर आणि पत्रकार श्री. श्रीनिवास दासरी यांनी श्री. राजहंस यांच्याशी विविध विषयांवर संवाद साधला.
३.सोलापूर येथील ‘बी. आर्.डी.एस्.’च्या ‘भक्ती चॅनल’वर संपादक श्री. उमाकांत चौडे यांनी श्री. चेतन राजहंस यांची मुलाखत घेतली, तर ‘स्वरांजली चॅनल’वरही मुलाखत घेण्यात आली.
४. सोलापूर आकाशवाणी कार्यालयात ‘तणाव नियंत्रण व्यवस्थापन’ या विषयावर श्री. चेतन राजहंस यांच्याशी संवाद साधण्यात आला.
५. दैनिक ‘सुराज्य’च्या कार्यालयात श्री. चेतन राजहंस यांच्याशी संवाद साधण्यात आला. या वेळी श्री. राकेश टोळ्ये, श्री. पुरुषोत्तम कुलकर्णी, श्री. रोनित टोळ्ये आणि अन्य पत्रकार उपस्थित होते.
६. धाराशिव येथील ‘तेरणा एफ्.एम्.’ रेडिओ कार्यालयात प्रमुख निर्देशक श्री. संजय मैंदर्गी यांनी श्री. राजहंस यांची ‘भारतीय संस्कृतीचा मूळ पाया असणारे अध्यात्म, त्यावर आधारित मानवता आणि तणावाचे व्यवस्थापन’, या विषयांवर विशेष मुलाखत घेतली.
|